तरुणांनी घेतली राष्ट्र उभारणीची शपथ

0

फैजपूर। साई गृप मित्र मंडळाच्या वतीने शहिद दिनानिमित्त शहिद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना श्रध्दांजली अर्पण करुन त्यांच्या थोर कार्याच्या स्मृती जागवल्या. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष निलेश राणे, पप्पू चौधरी, नगरसेवक अमोल निंबाळे यांची उपस्थिती होती. ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है’ व ‘इन्कलाब जिंदाबाद’ चा नारा देत हसतमुखाने मातृभूमीसाठी जीवाचे बलिदान देणार्‍या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

शहिदांच्या स्मृतीतून प्रेरणा घेण्याचे केले आवाहन
यावेळी तरुणांच्या माध्यमातून दुर्बल व वंचितांना आधार देवून समाज उत्थानातून राष्ट्र उभारणीची शपथ घेतली. याप्रसंगी सर्वप्रथम शहिदांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राध्यापक राजेेंद्र राजपूत यांनी श्रध्दांजलीपर भाषणात शहिदांचे कार्यकतृत्व उपस्थितांसमोर कथन करुन त्या स्मृतीतून प्रेरणा घेत आपापल्या परीने विकसित समाज घडविण्यासाठी सहभाग देण्याचे आवाहन केले. यावेळी तरुणांचा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होते. यावेळी साई गृप मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत दिपक काटे, बंटी कोळी, वैभव वकारे, हर्षद तडवी, मनोज चौधरी, भुषण भिरुड, पवन परदेशी, अशोक किरंगे, शिवा तेेली आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.