रावेर :- भोर येथील विवाहित तरुणास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू, मावस सासरे, मावस शालका विरुध्द रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. भोर येथील आशिष सांगळे (25) या विवाहित तरुणाच्या पत्नीला त्याची सासु प्रभाताई वढाल, मावस सालक योगेश काळे व मावस सासरा हे नांदवण्यास पाठवित नव्हते व त्याला चापटा व बुक्क्यांनी मारहाण करीत होते. खोट्या आरोपाला कंटाळून त्याने 26 रोजी गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत त्याचे वडील शांताराम सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार दीपक ढोमणे व सहकारी करीत आहेत.