पिंपरी : नामांकित फायनान्स कंपनीतून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून नवी सांगवी येथील युवकाची पाच लाख 18 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत रमेश भोंग (वय 38, रा. नवी सांगवी) यांनी अज्ञात तीन इसमां विरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोंग यांना एका नामांकित फायनान्स कंपनीमधून कर्ज मिळवून देतो, असे अज्ञात तिघांनी आमिष दाखविले आणि फिर्यादीकडून बँक व ऑनलाईन माध्यमातून तसेच आरटीजीएसद्वारे मागील आठ महिन्यात पाच लाख 18 हजार रुपये लाटले. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.