तरुणाला मारण्याच्या संशयावरुन सावत्र आईसह पित्याला मारहाण

0

सर्पदंशाने चिंचपुर्‍याचा तरुणाचा मृत्यू ; आठ वर्षापूर्वी आईचाही वादातून विषप्राशनाने मृत्यू

जळगाव : – कोंबड्यांची अडगळीतील अंडी काढत असतांना ललीत दिलीप जोहरे (वय-20 चिंचपुरा ता.जामनेर ) याने हात घातला असता त्याला सापाने त्याला दंश केल्याने त्याचा मृत्यु झाल्याची घटना सामेवारी घडली. दरम्यान ललीतच्या आईचा आठ वर्षापूर्वी विषप्राशनाने मृत्यू झाला आहे. त्यात एकुलत्या मुलाचाही मृत्यू झाल्याने त्याला मारुन टाकल्याच्या संशयातून मावसभाऊसह आजी व इतरांनी जिल्हा रुग्णालयात आलेल्या सावत्र आईसह वडीलांना मारहाण केल्याने गोंधळ उडाला होता.

दिलीप धोंडू जोहरे यांचे मथुराबाईसोबत विवाह झाला होता, लग्नानंतर बर्‍याच वर्षांनी त्यांना ललीत नावाचा मुलगा झाला. ललीत मानसीक विकलांग असल्याने त्याच्यावर लहानपणा पासुनच उपचार सुरु होते. दरम्यान पती-पत्नीच्या वादातून मथुराबाईने ललीत बारा वर्षांचा असतांना विष प्राशन करुन आत्त्महत्त्या केली होती. त्यानंतर त्याची संपुर्ण जबाबदारी वडील दिलीप धोंडू यांच्यावर आली. मात्र, त्यांनी लताबाई ऊर्फ मथुराबाई हिच्याशी दुसरा विवाह केला. घरात सावत्र आई आल्याने ललीतच्या आजोळ तेव्हा पासुनच नाराज होते. त्यात तो विकलांग असल्याने अधीक काळजी सर्वांनाच होती. आज सकाळी सावत्र आई लताबाई वडील दिलीप असे सर्व शेतमजुरीसाठी गेले असतांना ललीत घरात एकटाच होता. कुटूंबाला हातभार लागावा म्हणुन जोहरे कुटूंबीयांने शंभर ते दिडशे कोंबड्या पाळल्या आहेत. घरातील सर्वच सदस्य बाहेर असतांना ललीत घरात एकटाच होता. साडेबारा वाजेच्या सुमारास तो, कोंबड्यांची अंडी काढत असतांना दडून बसलेल्या सापाने त्याच्या हातावर दोन वेळा दंश केला. सर्पदंश झाल्याने शेजार्‍यांनी त्याला तातडीने जामनेर रुग्णालयात हलवले, तेथून ललीतला तातडीने जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. उपचार सुरु असतांना दुपारी साडेतीन वाजता ललीतचा मृत्यु झाला. वैद्यकीय अधिकार्‍यांनी मयत घोषीत करताच कुटूंबीयांनी आक्रोश केला.

सावत्र आईसह वडीलांना मारहाण
ललीतच्या मृत्युची माहिती कळताच आजोळ येथून आजी-मावशी आणि मावस भावासह नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. नातुचा मृत्यु झाल्याने त्याच्या आजीने जावाई आणि त्याची दुसरी पत्नीला जबाबदार धरुन तुम्हीच बरेवाईट करुन मारुन टाकल्याचा आरोप केल्याने नातेवाईकांनी पती-पत्नीला बेदम मारहाण केल्याने जिल्हा रुग्णालयात गोंधळ उडाला होता.