सह्याद्री नगरातील घटना ; संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी
जळगाव : शहरातील सह्याद्री नगरात घरासमोर उभा असलेल्या तरुणार मारहाण करत त्याच्या मोबाईल व रोख रक्कम हिसकविल्याची घटना दि. 7 रोजी रात्री 7: 30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासातच तालुका पोलिसांनी 4 संशयितांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्या. देशिंग यांनी चौघांना 12 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सह्याद्री नगरातील रहिवासी गुणवंत उर्फ सागर संजय चव्हाण (वय 27) हा रविवार दि. 7 रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास त्याच्या घरासमोर उभा असतांना संशयितांनी त्याला दोन तीन महिन्यापुर्वी आमचे हिराशिव कॉलनीजवळ भांडण झाले होते तेव्हा तू हसत होता असे म्हणत माहराण केली. त्यावेळेस अजय शंकर सपकाळे(वय 26), संजय राजेंद्र राठोड (वय 27) व एक अनोळखी तरुण(सर्व रा. निमखेडी, ता. जळगाव) यांनी सुध्दा मारहाण करत बापू उर्फ पांडुरंग याने गुणवंत उर्फ सागरच्या खिश्यातील रोख 5200 रुपये तर आकाश नन्नवरे याने मोबाईल हिसकविला.
गुन्हा दाखल होताच चौघांना अटक
गुन्हा दाखल झाल्यानंतर तालुका पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कदीर तडवी, हेड कॉस्टेबल जितेंद्र पाटील, सुशील पाटील, प्रितम पाटील, भारत पाटील, प्रफुल्ल धांडे या पथकाने बापु उर्फ पांडूरंग पाटील, अजय सपकाळे, संजय राठोड व आकाश नन्नवरे यांना अटक करत न्या. देशिंगे यांच्या कोर्टात हजर केले असता न्यायालयाने चौघांना दि. 12 पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले आहे. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अॅड. सुप्रिया क्षीरसागर यांनी काम पाहिले.