तरुणावर कुर्‍हाडीने हल्ला : जळगावच्या भवानी नगरातील घटना

जळगाव : शहरातील भवानीनगर येथील पानटपरीवर दोन जणांनी एका तरुणाला कुर्‍हाडीने मारहाण करून गंभीर दुखापत केली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा
राजेंद्र नवल पाटील (34, रा.हनुमान नगर, आयोध्या नगर, जळगाव) हा तरुण दुकान चालवून उदरनिर्वाह करतो. बुधवार, 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जगवानी नगरातील मामाजी हॉटेलजवळ असलेल्या पानटपरीवर सिगारेट घेण्यासाठी राजेंद्र पाटील गेला असता तेथे उभा असलेला आकाश अहिरे यांने सांगितले की, तू सिगरेट घे व इथून निघून जा, माझ्याकडे का पाहतो, असे बोलून शिवीगाळ केली. त्यानंतर सुनीता अहिरे हिनेदेखील शिवीगाळ केली तर आकाशाने कुर्‍हाडीने मारहाण केल्याने राजेंद्र पाटीलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी राजेंद्र पाटील यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत रात्री 11 वाजता राजेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी आकाश अहिरे, सुनीता अहिरे (दोन्ही रा.मामाजी हॉटेलच्या बाजूला जगवाणी नगर, जळगाव) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत करीत आहे.