तरुणास दोघांनी केली मारहाण

जळगाव : शहरातील सुभाष चौकात एका महिलेच्या भाजीपाल्याच्या पिशवीला पायाचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोघांनी तरुणाला बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शुक्रवार, 21 मे रोजी दुपारी शनिपेठ पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल
निलेश मुकुंदा कासार (38, रथ चौक, जळगाव) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार, 19 मे रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास शहरातील सुभाष चौकात ते दुचाकीने आले होते. दरम्यान, दुचाकीवरून उतरत असतांना त्यांचा पाय एका महिलेच्या भाजीपाल्याच्या पिशवीला लागला. या कारणावरून शोएबशह लसूनवाला आणि सिंकंदर लंगड्या ऑटोवाला (पुर्ण नाव माहित नाही) यांनी दुचाकीवरील तरुणाला बेदम मारहाण करून जखमी केले तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. निलेश कासार यांनी शनिपेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर शुक्रवार, 20 मे रोजी दुपारी शनीपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.