तरुणीचा विनयभंग, तरुणाचा शोध सुरू

0

यावल– शहरातील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचाा रविवारी ती शिकवणीला जात असतांना एकटी असल्याचे पाहून विनयभंग करण्यात आला. ही घटना शहरातील महाजन टी डेपो जवळील बोळात (लहान गल्ली) रविवारी सकाळी आठ वाजता घडली. मुलगी भेदरली व आरडा-ओरड करू लागल्यानंतर तरुणाने पळ काढला. उपनिरीक्षक सुनीता कोळपकर यांच्याकडे या प्रकाराचा तक्रार करण्यात आली असून संबंधित तरुणाचा शोध सुरू आहे.