तरुणीची छेड ; फुलगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

0
वरणगाव :- फुलगाव येथील 26 वर्षीय तरुणीची  छेड काढल्याप्रकरणी गणेश शंकर चौधरी (28, रा. फुलगाव) विरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणीसह तिची आई भुसावळ जाण्यासाठी फुलगाव बसस्थानकात बसले असताना आरोपीने छेड काढली. आपल्याशी लग्न न केल्यास तुझ्या कुटुंबाचे बरे-वाईट करेल, अशी धमकी देण्यात आली.  एपीआय जगदीश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुकेश जाधव करीत आहेत.