भुसावळ- भुसावळ विभागातील एका तालुक्याच्या गावात अल्पवयीन तरुणीच्या अंर्तवस्त्राची चोरी केल्याची घटना घडली असून या प्रकरणी अल्पवयीन मात्र मनोरुग्ण असलेल्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात वाढत असलेल्या विकृतींचे हे दर्शन असून याबाबत पालकांनी वेळीच आपल्या पाल्यांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचा सूरही यानिमित्त उमटत आहे. 16 वर्षीय तरुणीला सातत्याने अश्लील ईशारे करणार्या या मनोरुग्णाने तरुणीचे अंर्तवस्त्र दोन दिवसांपूर्वी लांबवल्यानंतर पुन्हा तरुणीच्या घराबाहेर आणून ठेवले. तरुणाच्या या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली.