तरुणीवर ऍसिड टाकण्याची धमकी

0

पिंपरी चिंचवड ः तरुणीचा पाठलाग करत तिच्या घरासमोर येऊन घरासमोरील वाहनांची तोडफोड करून आईवडिलांना शिवीगाळ केली. तसेच तरुणीच्या अंगावर ऍसिड टाकण्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी (दि. 4) पहाटे एकच्या सुमारास मोरया पार्क व सुवर्ण पार्क पिंपळे गुरव येथे घडली. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सागर सतीश दीक्षित (वय 28, रा. पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीचा वारंवार पाठलाग करत त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली आहे. फिर्यादी तरुणीकडे त्याने शारीरिक सुखाची मागणी करून गैरवर्तन केले. मंगळवारी पहाटे एकच्या सुमारास सागर पीडित तरुणीच्या घराजवळ गेला. त्याने तरुणीच्या गाड्यांची तोडफोड केली. तरुणीच्या आईवडिलांना शिवीगाळ करत अंगावर ऍसिड टाकण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.