पुणे: शिक्षणासाठी मदतिच्या बहाण्याने 19 वर्षीय तरुणीवर मौलवीने अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी युनूस हासिम शेख या मौलवीला अटक केली आहे.
आरोपी हासिम शेखचे नातेवाईक मुंबईत पीडित तरुणीच्या घराजवळ राहतात. त्यांना भेटण्यासाठी मौलवी नेहमी जात असे. दरम्यान पीडित तरुणीला बारावीनंतर सीएचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात यायचे होते. यासाठी तिच्या कुटुंबियांनी मौलवीला हॉस्टेल पाहण्यास सांगितले होते. परंतु सध्या कुठल्याच होस्टेलमध्ये जागा नसल्याचे सांगत त्याने पीडितेला हडपसर येथील स्वतःच्या आई-वडिलांच्या घरी राह्यला सांगितले होते. त्यानंतर त्याने काही दिवसांनी पत्नी बाहेर गेल्यानंतर पीडितेला घरी आणून तिच्यावर अत्याचार करू लागला.
आरोपीने तिची शैक्षणिक कागदपत्रे काढून घेऊन आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली आणि तिचे अश्लील फोटोही काढल्याची माहिती पीडितेने दिली. भीतीपोटी तिने हा प्रकार कुणाला सांगितला नव्हता पण मुंबईला गेल्यानंतर तिने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला.