तरुणीशी प्रेमविवाह केल्याचा नातेवाईकांना राग अनावर : मारहाणीत माय-लेक जखमी
हाणामारीत लाठ्या-काठ्यांचा सर्रास वापर : महिलेसह तरुण हाणामारीत जखमी : गावात तणावपूर्ण शांतता
Kusumba Khurd thrashes love marriage youth to death: Riot case against 12 suspects रावेर : प्रेमविवाह केल्याच्या रागातून तालुक्यातील कुसुंबा खुर्द गावातील तरुणाला 12 संशयीतांनी लाठ्या-काठ्यांचा सर्रास वापर करीत मारहाण केल्याने तरुणाचे डोके फुटले तर मारहाणीत तरुणाची आईदेखील जखमी झाली. ही धक्कादायक घटना बुधवार, 5 रोजी रात्री नऊ वाजता घडली. या प्रकरणी 12 संशयीतांविरोधात दंगल व अन्य कलमान्वये रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, दुसर्या गटानेही तरुणीशी बोलण्याच्या प्रयत्नानंतर समोरील गटाने लाठ्या-काठ्यांचा वापर करीत मारहाण केल्याचा आरोप करीत 12 जणांविरोधात तक्रार नोंदवली आहे.
शिविगाळ करीत ठार मारण्याची धमकी
शारदाबाई उत्तम भालेराव (50, कुसुंबा खुर्द) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा राहुल उत्तम भालेराव याने एका तरुणीशी प्रेमविवाह केला असून त्याचा राग मनात धरून तरुणीच्या नातेवाईकांनी बुधवारी रात्री नऊ वाजता लाठ्या-काठ्यांनी तसेच लाथाबुक्क्यांनी मुलाला मारहाण करीत शिविगाळ केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा वाद सोडवताना शारदाबाईदेखील जखमी झाल्या.
या संशयीतांना अटक
या प्रकरणी संशयीत आरोपी नितीन राजू भालेराव, प्रभाकर रावजी भालेराव, गोकुळ प्रभाकर भालेराव, शिलाबाई गोकुळ भालेराव, लक्ष्मण प्रभाकर भालेराव, गंगुबाई प्रभाकर भालेराव, अनिता लक्ष्मण भालेराव, संजय विठ्ठल भालेराव, मंगलाबाई रणजीत तायडे, कलाबाई राजू भालेराव, उज्ज्वला नितीन भालेराव, टोपलू भागवत भालेराव (सर्व रा.कुसुंबा खुर्द) यांच्याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना रावेर पोलिसांनी अटक केली आहे. तपास हवालदार सतीश सानप करीत आहेत.