भुसावळ- खाजगी क्लासेसला गेलेली अल्पवयीन तरुणी बेपत्ता झाल्याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरातील एका भागातील रहिवासी असलेली दहावीच्या विद्यार्थिनीला मंगळवारी पळवून नेल्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक के.टी.सुरळकर यांच्यासह कॉन्स्टेबल शंकर पाटील, विशाल मोहे यांनी शुक्रवारी सायंकाळी जळगावच्या गेंदालाल मिल परीसरातील संशयीत दीपक भिकन मेढे यास अटक केली तसेच तरुणीलाही ताब्यात घेवून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपी दीपक मेढे यास शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.