तरुण पिढीने महाराणा प्रतापांचा आदर्श घेण्याची गरज

0

नंदुरबार । आजच्या तरुण पिढीला महाराणा प्रतापांचा आदर्श घेण्याची गरज असून संघटीत होवून समाजात परिवर्तन घडवून आणावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर बेहेरे यांनी केले. ते येथील साप्ताहिक वीरक्रांती परिवारातर्फे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या प्रतिमा पुजन कार्यक्रमात बोलत होते. दि.28 मे 2017 रोजी साप्ता. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, ज्येष्ठ नेते हिरालालकाका चौधरी, न्युज पेपर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुर्यभान राजपूत, डॉ.नुतन शाह, उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी यांची विशेष उपस्थिती होती.

मतभेद विसरुन संघटीत होणे गरजेच
यावेळी रत्नदिप पाटील आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, समाजाने मतभेद विसरुन संघटीत होवून समाजाचा विकासाचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराणा प्रतापांचा अश्‍वरुढ पुतळा नंदनगरीमध्ये उभारावा यासाठी खेडोपाडी फिरून सह्यांची मोहिम राबवून अंदाजे 5 हजार सह्यांचे निवेदन आ.रघुवंशी यांना दिले आणि त्या निवेदनाची दखल घेत महाराणा प्रतापांचा अश्‍वरुढ पुतळा उभारला गेला, असे अरविंद पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमास नगरसेवक कैलास पाटील, संजय चौधरी, अशोकभाई राजपूत, दिनेश राजपूत, मोहिनीराज राजपूत, जितेंद्र राजपूत, भिमसिंग राजपूत, विलास राजपूत, चेतन राजपूत, जितेंद्र राजपूत, जीवन पाटील, हिरालाल चौधरी, रमेश महाजन, मनोज समशेर, किशोर गवळी, सुनिल चौधरी, मोहितसिंग राजपूत, भगतसिंग राजपूत, प्रसाद राजपूत, भोला राजपूत, ईश्‍वर शिरसाळे तसेच सर्व स्तरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.