तरूणांसाठी व्यसनमुक्ती शिबिरातून जनजागृती होणे गरजेचे

0

राजपुत मंगल कार्यालयात व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन
व्यसनमुक्ती अभियानाच्या अध्यक्षा सुचिता राजपूत यांचे प्रतिपादन

चाळीसगाव – आजचा तरुण मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन झाला असल्याने व्यसनमुक्ती शिबिरातुन जनजागृती होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन व्यसनमुक्ती अभियानाच्या अध्यक्षा सुचिता राजपूत यांनी लक्ष्मी नगर स्थित राजपूत मंगल कार्यालयात दि ९ रोजी सायंकाळी ७ वाजता झालेल्या कार्यक्रमात केले. चाळीसगाव शहरात सकाळी ९ ते १० या वेळेत ए.बी.हायस्कूल, १० ते १२ के.आर.कोतकर मोठे काँलेज, व दुपारी १२ ते २ यावेळेत राष्ट्रीय कन्या शाळेत व्यसनमुक्ती शिबिरे घेण्यात आले. तद्द्नंतर राजपुत मंगल कार्यालयात सायंकाळी ७ वाजता झालेल्या व्यसनमुक्ती कार्यक्रमात झाला त्यावेळी त्या बोलत होत्या.

पुढे बोलतांन सुचिता राजपूत म्हणाल्या की, कॉलेज जीवनात तरूण व्यसनाकडे वळल्याने व्यसनाने कॅन्सरच्या आजाराचा धोका बळवण्याचा शक्यता असल्याने वेळीच त्यातुन तरुणांना बाहेर काढण्यासाठी व्यसनमुक्ती जनजागृती सुरू केली असल्याचे सांगितले. तर चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. विनोद कोतकर यांनी बोलताना सांगितले की, महात्मा गांधी यांनी मूठभर मिठ घेऊन सत्याग्रह सुरू केला पुढे त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातुन भारत देश स्वातंत्र्य झाला सुचिता राजपूत यांनी व्यसनमुक्तीचा विडा घेतल्याने त्यांना देखील तरुणांना व्यसनापासुन मुक्त करण्यास यश मिळणार असल्याचे सांगितले. उमंग महिला परीवाराच्या संस्थापिका संपदा पाटील यांनी बोलताना सांगितले की, चाळीसगाव येथे सामाजिक संघटना चांगले कार्य करत असुन आपल्या व्यसनमुक्ती कार्याला सहकार्य करून देशाचे भविष्य असलेल्या तरुणांनी शरीर संपदेकडे लक्ष देवुन उज्वल भविष्यासाठी व्यसनापासून दुर राहिले पाहिजे व्यसनाने स्वताच्या परीवाराकडे दुर्लक्ष होऊन कुंटुबाची प्रगती थांबत असल्याचे मार्गदर्शनातुन सांगितले.

कार्यक्रमास अनेकांची होती उपस्थिती
वसुंधरा फाऊंडेशन अध्यक्षा स्मिता बछाव, नाशिक येथील डॉ. अनुप भारती व मुकेश वोरा, दिपक काबंळे यांनी व्यसनमुक्ती कार्यक्रमातुन उपस्थितना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार मंडळाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी, रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार तर पालिका आरोग्य सभापती वैशाली राजपूत, हिरकणी महिला मंडळ अध्यक्ष सुचित्रा राजपूत, करणी सेनेच्या सुवर्णा राजपूत, शिवसेना महिला तालुका उपप्रमुख सविता कुमावत, नाशिकचे सुभाष पाटील, करगाव येथील डॉ.स्वर्णसिंग राजपूत, प्रदीप पवार, वडगाव लांबे सरपंच ज्ञानेश्वर पाटील, डॉक्टर जोशी, दड पिंपरी निलेश राजपूत, मोहन पवार, मुन्ना पाटील, अमोल राजपूत, गणेश राजपूत, राज राजपूत अनिल सिरसाट, जितु वाघ, तसेच लांबे वडगाव, करगाव, दडपिंप्री, बेलदारवाडी येथील ग्रामस्थ व सामाजिक सघंटना फाऊंडेशन, सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते.

-फोटो आहे