जळगाव । नशिराबाद येथील भवानी नगरात एका 26 वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. नामेदव लोटू मराठे असे मयत तरूणाचे नाव आहे. मयत हा अॅपे रिक्षा चालक होता.
नामदेव हा आई तापाबाई व त्याचा लहान भाऊ भागवत यांच्या सोबत राहत होता. बुधवारी सकाळीच तापाबाई व भागवत हे शेतात मजुरी साठी गेले होते. त्यामुळे नामदेव हा घरी एकटाच होता.
आई-भाऊ गेले होते शेतात कामाला
दुपारी 3 वाजेच्या सुमारास आई तापाबाई व नामदेव याचा भाऊ भागवत हे शेतातून घरी आले. दार उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर कुणी उघडत नसल्याने त्याने दार तोडून आत प्रवेश केला असता नामदेव याने गळफास घेतल्याचे दिसून आले. यावेळी तापाबाई व भागवत यांनी आरडा-ओरडा करीत एकच आक्रोश केला. यानंतर सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास नातेवाईकांनी व मित्रमंडळींनी नामदेव याला जिल्हा सामान्य रुग्णालयातयात त्याला दाखल केले. डॉक्टरांनी नामदेव याची तपासणी केली असता मृत घोषीत केले. नामदेवचा काही महिन्यांपुर्वी अपघात घडला होता यात त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्याची आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने गावतील नागरीकांनी त्याच्यावर उपचार केले होते. त्याच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही.