तरूणाच्या खिशातून पैसे लांबविले

0

जळगाव। अविनाश अंभोरे (वय-26 रा. गेंदालाल मिल) हा तरूण शुक्रवारी सायंकाळी खाँजामिय्या चौकातील गिताशंकर जलतरण तलावात मित्रांसोबत पाहेण्यासाठी गेला होता. पोहण्याआधी तलावाच्या बाजूला कपडू काढून ठेवले असल्याने अज्ञात चोरट्याने अविनाश याच्या पँन्टच्या खिशातून सातशे रूपये चोरून नेले.

जलतरण तलावतून बाहेर आल्यानंतर त्याला त्याच्या पँन्टच्या खिखातून पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले. यानंतर त्याने पैसे चोरीला गेल्याचे मित्रांना सांगितले. त्यांनी लागलीच जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.