जळगाव : पिंप्राळ्यातील भवानी मंदिर जवळ रस्त्यावरून ये-जा करणार्यांना दगड मारून फेकणार्या तरूणाला नागरिकांनी शुक्रवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास चांगलाच पब्लिक मार दिल्याची घटना घडली. यावेळी बघ्यांची चांगलीच गर्दी झाली होती. दरम्यान, तरूणाच्या कुटूंबियांना बोलविण्यानंतर तरूणाचे मानसिक संतूलन बिघडले असल्याचे सांगून त्याला उपचारार्थ दाखल केले होते. मात्र, तो सकाळी हॉस्पीटलमधून पळून गेल्याचा कुटूंबियांनी नागरिकांना सांगितले. यानंतर नागरिकांनी तरूणाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले.
शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळील एका खाजगी हॉस्पीटलमध्ये एका तरूणाला त्याच्या कुटूंबियांनी गुरूवारी रात्री उपचारार्थ दाखल केले होते. शुक्रवारी पहाटे मात्र तरूण हा हॉस्पीटलमधून पळून गेला. तरूण हा पिंप्राळा येथील भवानी मंदिर परिसरात आला. यावेळी त्याने रस्त्यावर उभा राहून आरडा-ओरडा करायला लागला. यातच रस्त्यावरून ये-जा करणार्या लोकांना त्याने फेकून मारले.
एका महिलेला दगड लागल्याने ती जखमी झाली. तर त्याने मंदिरासमोरच असलेल्या दुकानातही दगड मारून फेकला. दुकानातही किरकोळ साहित्यांचे नुकसान झाले. तरूण हा ये-जा करणार्यांना दगड मारत असल्याने संतप्त नागरिकांनी त्याला पकडले. स्वत:ची सुटका करण्यासाठी तो नागरिकांना हिसका देवून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. परंतू त्याने शिवीगाळ करण्यास सरुवात केल्याने त्याला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. त्याला पब्लिक मार दिल्यानंतर पुन्हा दगड मारून नये यासाठी नागरिकांनी त्याला पकडून ठेवत त्याचे हात पाय दोरीने बांधून ठेवले. काहींनी पोलीसांशी संपर्क साधून लोकांना दगड मारणार्या तरूणाला पकडून ठवले असल्याची माहिती दिली.
पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत तरूणाची विचारपूस केली. यावेळी तरूणाच्या खिशात मोबाईल सापडला. मोबाईलमध्ये तरूणाच्या वडीलांचा मोबाईल क्रमांक मिळाल्यानंतर त्यांनी संपर्क साधला व तुमच्या मुलाने येथे गोंधळ घातला असून त्याला पकडून ठेवले असल्याचे सांगितले. काही वेळातच कुटंबियांनी पिंप्राळ्यात आले. पोलीसांनी कुटूंबियांना तरूणाबाबत विचार पुस केली. गुरूवारी गोविंदा स्टॉपजवळ असलेल्या खाजगी हॉस्पीटलमध्ये मानसिक संतूलन बिघडले असल्याने मुलाला उपचारार्थ आणले होते.
मात्र, तो शुक्रवारी पहाटे हॉस्पीटलमधून काहीही न सांगता निघून गेला. अशी माहिती त्याच्या पालकांनी दिली. तरूण हा मनोरूग्ण असल्याने नागरिकांनी त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. तरूणाला मारहाणीची बातमी परिसरात पसरताच नागरिकांनी त्या ठिकाणी एकच गर्दी केली होती. मनोरूग्ण तरूणाला पालकांना सोपविल्यानंतर गोंधळ शांत झाला. या घटनेची परंतू दिवसभर चर्चा सुरू होती. यातच नागरिकांनी चांगलाच चोप दिला असल्याने तरूणाला देखील किरकोळ जखमा झाल्या होत्या. परंतू कुटूंबियांनी घटनास्थळी येवून संपूर्ण हकीकत सांगितल्यानंतर तरूण हा मनोरूग्ण असल्याचे समोर आले.