तरूणाला भामट्याने घातला पाच हजारांचा गंडा

0

जळगाव । धुळे येथील रहिवासी असलेल्या तरूणाच्या खात्यातून तीन वेळा ट्रान्झॅक्शन करून पाच हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला असून याप्रकरणी तरूणाने जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे. कैलास मच्छिद्र पाटील हा तरूण धुळ्याचा रहिवासी असून पुणे येथील चिंचवडमध्ये दि कल्याण जनता सहाकारी बँकेत त्याचे खाते आहे. दरम्यान, तरूणाच्या खात्यातून 11 जुन रोजी सकाळी 9.45 ते 10.45 या एक तासाच्या वेळात तीन वेळा ट्रान्झॅक्शन करून अज्ञात चोरट्याने जळगावातील गणेश कॉलनी परिसरातील महावीर सहकारी बँक शाखेच्या एटीएममधून 5 हजार रुपयांची रोकड काढली. यानंतर बँकेत आल्यानंतर कैलास याला खात्यातून पाच हजार रुपये काढल्याची बँकेने दिली. त्यानंतर खात्यातून पैसे काढल्याचे सांगताच महावीर बँकेतून पैसे काढल्याची माहिती बँकेने दिली. आपली फसवणुक झाल्याचे कैलास यास कळताच त्याने आज सोमवारी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्याबाबतचा अर्ज दिला आहे.