साक्री । शहरातील पिंपळनेररोड वर असलेला पेट्रोल पंपवर उदर निर्वाहसाठी पर राज्यातून आलेल्या मोहम्मद मुख्टार आलम (वय 30) हा पेट्रोल पम्प च्या मागील बाजूस असलेली मोटर सुरू करण्यासाठी गेले असता तिथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोहम्मद तेथून पळ काढण्यात यशस्वी झाल्याणे त्याचे प्राण वाचले. या आधी ही याच परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने घबरातीचे वातवरण निर्माण झाले आहे.