तरूणास मारहाण करणार्‍या दोघांना अटक

0

जळगाव। भांडण सोडविण्यासाठी आल्याचा राग आल्याने वासुदेव भागवत सोनवणे यास दोघांनी लाकडी दांड्याने व लोखंडी रोडने मारहाण केली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी दोन्ही संशयितांना आज मंगळवारी अटक केली आहे. तर त्यांना दुपारी न्यायाधीश व्ही.एच. खेडकर यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दोन दिवसांची पोलिस कोठडी

कांचननगरातील उज्ज्वलनगरात 28 मे रोजी सायंकाळी 6 वाजता भांडण सोडविण्यासाठी आल्याचा राग आल्याने वासुदेव सोनवणे याला दिलीप सोनवणे व जितेंद्र उर्फ जॉन सोनवणे या दोघांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर वासुदेव सोनवणे याच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर वासुदेव याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, दोन्ही संशयित हे घटना घडल्या पासून फरार होते. तर आज मंगळवारी पोलिस उपनिरीक्षक पवन राठोड यांनी मारहाणातील संशयित दिपीप वासुदेव सोनवणे व जितेंद्र उर्फ जॉन वासुदेव सोनवणे रा. वाल्मीकनगर या दोघांना दुपारी अटक केली. यानंतर त्यांना न्यायाधीश व्ही.एच. खेडकर यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन्ही संशयितांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. निखील कुलकर्णी यांनी कामकाज पहिले.