विषारी औषध सेवन केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू
चाळीसगाव – तालुक्यातील एकलहरे येथील रहीवासी १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने कन्नड तालुक्यातील नागद येथे मामाच्या घरी २ जानेवारी रोजी दुपारी विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तीचा गुरूवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीसात एकलहरे येथील चार जणांविरूद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला आहे.
प्राप्त माहिती नुसार, तालुक्यातील एकलहरे येथील महाविद्यालयीन तरुणी उमा हिरालाल परदेशी (वय-१९) ही काही दिवसांपूर्वी मामा भगवान परदेशी यांच्या घरी शिकण्यासाठी साठी नागद ता.कन्नड येथे गेली होती. २ जानेवारी २०१९ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास तिने घरी काहीतरी विषारी औषध सेवन केल्याने तिला चाळीसगाव येथील गजानन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला झिरो नंबरने अकस्मात मृत्यूची नोंद करुन कन्नड पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला असुन प्राथमिक तपास पोलीस नाईक विठ्ठल पाटील करीत आहेत.
या चार जणांविरूद्ध गुन्हा
तरूणीच्या आत्महत्येप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीसात फिर्यादी हिरालाल परदेशी यांच्या फिर्यादीवरून योगेश रतन परदेशी, कौशल्याबाई रतन परदेशी, रतन धुळाराम परदेशी, निलेश रतन परदेशी सर्व राहणार एकलहरे यांच्या विरोधात भाग गु.रं.नं. 2/2019 भादवी कलम 306,506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि हमिद चांद शेख करीत आहे.