जळगाव । मू.जे.महाविद्यालयातील तत्वज्ञान विभागात बी.ए. (तर्कशास्त्र) या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु असून नाव नोंदणी सुरु आहे. तर्कशास्त्र हे विचांरांचे शास्त्र आहे. हा विचार म्हणजे ज्ञान प्रमाणांचा विचार. ज्ञान प्रमाणे कोणती ? ज्ञान प्रमाणातून चिकित्सा कशी केली जाते ? या बाबींचा अभ्यास यातून केला जातो. संशोधनाच्या विविध संधीसाठी हे शास्त्र उपयोगी पडते. मानवी जीवनात या शास्त्राचे खूप महत्व आहे. अभ्यासक्रमाला प्रवेश मर्यादित असून इच्छूक विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता विभागप्रमुख डॉ.रजनी सिन्हा (9890312986), डॉ.व्ही.एस.कंची (8999827060) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांनी केले आहे.