तर्‍हाडीत योग दिन साजरा

0

तर्‍हाडी । येथील आण्णासो साहेबाराव सोमा पाटील विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजारा करण्यात आला. यात इयत्ता 5 वी ते 12वीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. योग शिक्षण डी. बी. पाटील व ए. एम. सोनवणे यांनी योगांचे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांना योगासनांचे प्रशिक्षण दिले.

आर. एस. चव्हाण यांनी योगाचे फायदे व योगासन कसे करावे याविषयी माहिती दिली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुधीर भामरे, कार्याध्यक्ष सुभाष भामरे, मुख्याध्यापक एन. एच. कश्यप, ए. के. पाटील, व्ही. डी. पाटील, बी. ए. मराठेंसह सर्व शिक्षक उपस्थित होते.