वरूळ । तर्हाड कसबे येथे शिरपूर पॅटर्न बंधार्याचे भूमिपूजन भुपेशभाई पटेल यांच्या हस्ते झाले. तर्हाड,वरुळ, भटाने, भामपूर,जलोद परिसरातील नागरिक उपस्थित होते. भुपेशभाई पटेल,धनंजय पाटील ,शिरपूर पर्टनचे जनक सुरेश खानापूरकर उपस्थित होते.
येत्या काळात शिरपूरच्या पश्चिम भागात आणखी बंधारे बांधण्यात येतील यासाठी भरपूर निधी उपलब्ध करण्यात येईल आणि विकास करण्यात येईल, असे भुपेश पटेल म्हणाले. सुरेश खानापूरकर यांनी पावसाच पडणारे थेंब थेंब पाणी बंधार्यात साठवून या परिसरातील पाण्याची खालावलेली पातळीत सुधारणा करणे आणि जमीन ओलिताखाली आणणे जे उद्दिष्ट्यअसून त्यांनी पाण्याचे,जमिनिविषयी मार्गदर्शन केले. परिसरातील सरपंच,उपसरपंच, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.