…तर दुसरं लग्न करण्याला परवानगी  सुप्रीम कोर्ट

0

नवी दिल्ली :घटस्फोटाच्या खटल्यात दोन्ही पक्षकारांमध्ये खटला मागे घेण्यासंबंधी तडजोड झाली असेल तर घटस्फोटाची याचिका कोर्टात प्रलंबित असली तरी त्यातील एका व्यक्तीला दुसरे लग्न करता येऊ शकते, असा महत्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने एका याचिकेवर सुनावणी करताना दिला.

घटस्फोटाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्याआधी दुसरे लग्न रोखण्यासंबंधी कायदा लागू होत नाही. हिंदू अॅक्टनुसार, घटस्फोटाविरुद्ध दाखल करण्यात आलेली याचिका प्रलंबित असेल तर दोन्ही पक्षकारांपैकी एकाला दुसरे लग्न करता येत नाही. परंतु, जर पक्षकाराने तडजोडीच्या आधारावर खटला कोर्टात पुढे न चालवण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यातील एका व्यक्तीचे दुसरे लग्न मान्य आहे, अशी हिंदू मॅरेज अॅक्टच्या कलम १५ मध्ये तरतूद आहे.

सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून त्यात पतीने घटस्फोट याचिकेविरोधात खटला मागे घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता तसेच त्याने त्यादरम्यान दुसरं लग्न सुद्धा केलं होतं. हायकोर्टानं हे लग्न अमान्य केले होते. परंतु, सुप्रीम कोर्टाने पतीची याचिका दाखल करून घेत हायकोर्टाचा निर्णय बदलला व पतीच्या बाजुने निर्णय दिला आहे.