पंढरपूर : पार्थ पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. ख्रिस्ती धर्मगुरुकडे जाण्याचे कृत्य चुकीचेच होते. त्याच्या हातून अजाणतेपणी ती चूक घडली आहे. पार्थ तरुण आहे, तो चुकला तर लगेच फाशी द्याल का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी उपस्थित करत माध्यमांवर आगपाखड केली आहे.
पार्थ पवारांना वारंवार ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. पार्थ पवारांनी गेल्या आठवड्यात विनियार्ड वर्कर्स चर्चला सदिच्छा भेट दिली. यावेळी फादर डॉ. पीटर सिल्व्हा यांनी विजयासाठी आशीर्वाद दिले होते. हे फादर पीटर सिल्वा म्हणजे केवळ देवाला प्रार्थना करुन हृदयरोगासारखा आजार बरा करण्याचा दावा करणारे धर्मगुरु म्हणून ओळखले जातात. यावर भाष्य करतांना अजित पवार म्हणाले की, सोबतची मंडळी आग्रह धरतात आणि मग जावे लागते. ही गोष्ट अजित पवारांनी केली असती, तर ती चूक ठरली असती. पण पार्थकडून ते नकळत झाले, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.
Prev Post
Next Post