जळगाव : रोजा हा सर्व दृष्टिकोनातून असतो. तो तुमच्या डोळ्यांचा असतो, बोलण्याचा असतो, वागण्याचा असतो. किंबहुना, जर सर्वजण या पध्दतीने रहायला लागले तर पोलीस खात्याची गरज आणि पोलीस खात्याचे काम हे जवळपास 90 टक्के कमी होईल, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी केले. युथ फॉर हेल्प फाऊंडेशन आणि शनिपेठ पोलीस ठाण्यातर्फे ओक मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय इफ्तार पार्टीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर महापौर ललीत कोल्हे, मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे, उपमहापौर गणेश सोनवणे, माजी उपमहापौर करीम सालार, गणपती महामंडळाचे दीपक जोशी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलीक, अयाज अली, शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण वाडीले, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार आदी उपस्थित होते.
महिलांसाठी घेणार इफ्तार पार्टी
शनिपेठ पोलीस ठाणे आणि युथ फॉर हेल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून यावर्षी सर्वधर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. पुढील वर्षी आम्ही संयुक्त विद्यमाने सर्वधर्मीय महिलांनी महिलांसाठी इफ्तार पार्टी आयोजित करण्यात यावी, असे नियोजन असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण वाडीले यांनी दिली.
यशस्वितेसाठी यांचे परीश्रम
कार्यक्रमासाठी युथ फॉर हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष चेतन वाणी, पदाधिकारी वसीम खान, सुमीत कोल्हे, नईम खान, राकेश वाणी, जावेद शेख, विकार पिंजारी, कमलेश देवरे, सलमान बागवान, तौसिफ पिंजारी, सनी भालेराव, नाजीम खान, इम्रान खान, सुमेध भालेराव, अझहर खान, शाहरुख खान, मयुर विसावे, जकी अहमद, शाकीर खाटीक आदींसह शनिपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, उपनिरीक्षक सुरेश सपकाळे व सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.