ऑस्ट्रेलियाचे इमाम मोहम्मद ताहिदी हे नाव सर्वसामान्य नागरिकांना माहीत असेल की नाही यात शंका आहे. पण या नावाची कट्टर इस्लामवाद्यांमध्ये खूप दहशत आहे. याच मोहम्मद ताहिदी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली. कट्टर इस्लामच्या विरोधात मोहीम चालवणार्या ताहिदी यांनी ख्रिसमसच्या दिवशी ट्विट करुन विचारले की, भारतातील लोक मला ओळखता का? त्यांचे ही ट्विट जानेवारी महिन्यापर्यंत 10 हजार वेळा रिट्विट झाले तर ते भारतात येतील. ताहिद यांचे हे ट्विट जानेवारी सोडा, केवळ तीन दिवसांमध्ये तब्बल 17 हजारहून अधिक वेळ रिट्विट झाले आहे. या प्रतिसादावर भाष्य करताना ताहिद यांनी आणखी एक ट्विट केले, मी जर भारतात आलो तर इथले कट्टरपंथी मुस्लिम एकतर मक्केला जातील किंवा आकस्मिक सुट्टीवर जातील.
इराणमध्ये जन्मलेले ताहिदी हे इराकी वंशाचे शिया मुस्लिम आहेत. अवघ्या 35 वर्षांच्या ताहिदी यांनी इराणमधील क्ओम येथील अल मुस्ताफा विद्यापिठातून इस्लामिक वेंदात या विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवली असल्याचे सांगितले होते. मात्र 2012 मध्ये विद्यापिठानेच पत्रक काढून, ताहिदी यांनी विद्यापिठात प्रवेश घेतला होता पण 2012 मध्ये त्यांनी अभ्यासक्रम अर्धवट सोडून दिल्याचे सांगितले. याशिवाय त्यांना कठेही व्याख्यान देण्यास विद्यापिठाने मनाई केली आहे. पण ताहिदी हे इस्लामिक विद्यालयाचे पदवीधर असल्याचे काहींचे म्हणणे आहे. ताहिदी यांच्या शिक्शणाप्रमाणे त्यांची इमाम ही पदवीदेखील वादादीत आहे. ते स्वत:ला शांतीवादी इमाम म्हणूवन घेतात. पण त्यांच्या या पदवीलाही ऑस्ट्रेलियन नॅशनल इमाम कॉन्सिल किंवा त्याच्या समतुल्य असणार्या साऊथ ऑस्ट्रेलियन कॉन्सिल किंवा ऑस्ट्रेलियातील मशिदी, प्रार्थना स्थळाने मान्यता दिलेली नाही. इस्लामिक असोसिएशन ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया या संस्थेचे प्रमुख म्हणून ताहिदी जगभर इस्लामच्या शिकवणीबद्दल व्याख्याने देण्यासाठी फिरत असतात. पण त्यांची खरी ओळख कट्टरपंथी इस्लामच्या विरोधात मोहीम चालवणारे अशी आहे. आता हेच ताहिदी भारतात येऊ इच्छितात. ताहिदी यांनी जिहादच्या नावाखाली जगभरात होणार्या इस्लामिक दहशतीवादूी हल्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. जगात कुठेही इस्लामिक दहशतवाद्यांनी कारवाई केली तर ताहिदी इस्लाममधील सर्व इमामांना धारेवर धरतात. त्यामुळे आपल्या वक्तव्यांमुळे ताहिदी यांना जगातील बहुतेक इमाम आपला विरोधक समजतात. बेल्जियममधील बु्रसेल्स येथे झालेल्या इस्लामिक हल्ल्यानंतर ताहिदी यांनी जगभरातल्या इमामांना जिहादवर उपदेश न करण्याचे आवाहन केले होते. याशिवाय इस्लामिक कट्टरपंथीयांकडून होणार्या हल्ल्यांचा निषेध करण्यास सांगितले होते. मुस्लिम महिला परिधान करत असलेल्या हिजाबवरही ताहिदी यांनी टिका केली होती. महिलांनी हिजाब धारण करु नये असे त्यांनी खुलेआम सांगितले होते. त्यांच्या या विरोधी भूमिकेमुळे मागील महिन्यात ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. दोघा मुस्लिम युवकांनी त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडून त्यांना अनेक ठोसे लगावले होते. जागतिक व्यासपिठावर ताहिदी यांनी शरिया कायदा लागू करणार्या इस्लामिक राष्ट्रांवर टिकेचा आसूड ओढला आहे. इस्लामची पुर्नमांडणी करण्याचा इरादा बोलून दाखवणार्या ताहिदी यांनी आयसीसीसारख्या कट्टरपंथियांना विरोध करताना कुराणचा अपमान करणारेच आंतकवाद पसरवत असल्याचे जाहिरपणे सांगितले. ताहिदी यांच्या संभाव्य भारतभेटीबद्दल अजूून तरी मुस्लिम धर्मगुरु किंवा संप्रदायाकडून कुठलीही प्रतिक्रीया आलेली नाही. भारतातही त्यांना विरोध होण्याची शक्यता गृहीत धरल्यास देशातील राजकारणी कात भूमिका घेतात याची सगळ्यांना उत्सुकता असेल.
– विशाल मोरेकर
प्रतिनिधी जनशक्ति, मुंबई
9869448117