कर्नाटक: लोकसभेच्या अंतिम टप्प्याचे मतदान १९ मे ला होणार असून, या अंतिम टप्प्याच्या प्रचारात राजकीय नेते मंडळी एकमेकांवर चिखलफेक करत आहे. निवडणुकीत कुणी पंतप्रधान यांना चौकीदार चोर है, तर काही सैनिकांच्या टाळू वरचे लोणी खाणारा नेता असे संबोधत आहे. त्यातच आता वादग्रस्त विधान केले आहे त्यांनी कॉंग्रेसला लोकसभा निवडणुकीत ४० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मोदी दिल्लीतील विजय चौकात गळफास घेतील का? असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
कर्नाटक येथील चिंचोली विधानसभा मतदार संघातील प्रचार सभेत बोलत होते. मोदींनी कॉंग्रेस ४० जागा जिंकणार नाही असा दावा केला होता त्यावर बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी हे विधान केले आहे
त्यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या खासदार शोभा करंदलाजे यांनी त्यंच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, माफीची मागणी केली आहे.