तर शमीने तलाक दिला असता : हसीन जहा

0

कोलकाता : क्रिकेटर मोहम्मद शमीवर आरोप करून चर्चेत आलेली त्याची पत्नी हसीन जहाने आता नवा आरोप केला आहे. हसीन जहाने रविवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. त्यानुसार, पती शमीच्या बीएमडब्लू कारमध्ये त्याचा मोबाईल आपल्या हाती लागला नसता तर शमीनेच आपल्याला तलाक देऊन सोडले असते. मोबाईल हाती लागल्यानंतरच त्याचे सत्य समोर आले. तेव्हापासूनच शमीचे वर्तन बदलले होते. हसीन जहाने शमी विरोधात अनेक महिलांसोबत अफेअर ठेवण्याचे आरोप केले आहेत. तसेच त्याच्या विरोधात कोलकात्यात एफआयआर दाखल करून मारहाण, बलात्कार, जिवे मारण्याचा प्रयत्न आणि हुंडाबळी अशी तक्रार दाखल केली. यात तिने एकूणच 4 जणांना आरोपी केले आहे.