…तर १५ मे पर्यंत मुंबईत कोरोनाचा हाहाकार माजेल

0

मुंबई – केंद्र सरकारच्या असेसमेंट टीमने मुंबई शहरात १५ मे पर्यंत ७५ हजार कोरोना रुग्ण आढळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मे महिन्याचा तिसरा आठवडा मुंबईकरांसाठी मोठा आव्हानात्मक असणार आहे. कोरोना रुग्ण दुप्पट होण्याच्या संख्येच्या आधारावर केंद्रीय टीमच्या अंदाजानुसार ७५ हजार रुग्णांपैकी ६३ हजार रुग्ण विना लक्षण असतील तर १२ हजार रुग्णांमध्येे लक्षणे दिसून येतील, असे म्हटले आहे.

मुंबई महापालिकेनेही या संकटाशी लढण्यासाठी तीन आक्रमक योजना बनवल्या आहेत. याअंतर्गत कॉन्ट्रेक्ट ट्रेसिंगवर भर दिला जाणार आहे. विना लक्षण असणार्‍या रुग्णांसाठी कोविड १९ केअर सेंटरसोबतच खासगी आणि सरकारी रुग्णालयात क्षमता वाढवण्यात येईल. दरम्यान, नायर, सेव्हनहिल, कस्तुरबा आणि एचबीटी ट्रॉमा रुग्णालयात तैनात वैद्यकीय पथके रुग्णांची काळजी घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये ७ हजार ५०० बेड स्वतंत्रपणे तयार केले गेले आहेत, त्यापैकी २५० बेड्स आयसीयूमध्ये आहेत. येत्या काही दिवसात बीएमसी येथे ५०० बेडची आणखी व्यवस्था करेल.