जळगाव। तलवारीने केक कापणार्या दोन्ही तरूणांच्या वाढदिस साजरे करणे शुक्रवारी चांगलेच अंगलट आले असून दोघांविरूध्द शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शनिपेठ पोलिसांनी दोन्ही तरूणांना अटक केली आहे. चौघुले प्लॉट परिसरात सोमनाथ मारोती सोनवणे या युवकाचा 23 वा वाढदिवस होता. त्यामुळे त्याने वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन केले होते.
डिजेही लावण्यात आला होता. शुक्रवारी रात्री 9 वाजता वाढदिवसाच्या कार्यक्रमात चक्क सोमनाथ याने नंग्या तलवारीने केक कापला. या दरम्यान, पुष्पक अनिल जाधव याकडे सुरा असल्याने त्यानेही केक कापण्यासाठी सुर्याचा वापर केला. दरम्यान, वाढदिवसाचे फोटा व्हाट्स अॅपवर व्हायरल झाल्यानंतर शनिपेठ पोलिसांना तलवारीने केेक कापतानाचा फोटो दिसताच त्यांनी हा प्रकार कुठला याबाबत शोध घेतला. चौघुले प्लॉट येथे सुरू असलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हा प्रकार असल्याचे समोर येताच पोलिसांनी लागलीच चौघुले प्लॉट गाठत सोमनाथ याला ताब्यात घेतले.