तलाठी मारहाणीचा रावेरात निषेध ; कर्मचार्‍यांचे लेखणी बंद आंदोलन

0
रावेर :– अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणार्‍या वाहन चालकासह मालकाने पिंगलवाडे (ता.अमळनेर) येथील तलाठी यांना मारहाण केल्याचा रावेरात निषेध करण्यात आला. शुक्रवारी  तहसील कार्यालयात तलाठी संघ व महसूल कर्मचारी संघटनेने काळ्या फिती लावून निषेध नोंदवत लेखणी बंद आंदोलन करीत दोषींवर कठोर कारवाईची मागणी तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्याकडे केली.
महसूल कर्मचारी संघटनेचे सकावत तडवी, प्रगती कोल्हे, संगीता घोंगडे, शिवकुमार लोलपे, शेखर तडवी, अमोल घाटे, संजय राठोड, ए.यू.घाटे, मंडळाधिकारी एन.जे.खारे, तलाठी पी.आर.वानखेडे, डी.बी.पवार, वाय. आय.तडवी, ए.एम.खवले, जी.सी.बारेला, वाय.एच.न्हाळदे, के.के.कदम, तलाठी गवई, ए.एम. खवले, आर.एस.जोरवार, डी.व्ही.कांबळे, एच.व्ही.वाघ, प्रवीण पाटील, वसावे आदींनी काळ्या फिती लावून निदर्शने केली.