तळजाई वृक्षतोडप्रकरणी पालिका आयुक्तांना नोटीस

0

पुणे : तळजाई टेकडीवर महापालिकेकडून उभारल्या जात असलेल्या सौरऊर्जा प्रकल्प व वाहनतळाला विरोध वाढत असून, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जानगवळी यांनी यासंदर्भात पालिका आयुक्त सौरभ राव यांना नोटिस बजावली आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार असून हे काम न थांबवल्यास न्यायालयात आणि राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

महापालिकेने पाचगाव पर्वती येथील स. नं. 67 ते 73 याठिकाणी वनिकरण असलेल्या जागेवर सौरऊर्जा प्रकल्प व वाहनतळ बनविण्यासाठी निविदा काढलेली आहे. पर्यावरणाचा संभाव्य र्‍हास लक्षात घेऊन या प्रकल्पाला विरोध असून यामुळे झाडे, पक्षी, वन्य जीवांचे अस्तित्त्व धोक्यात येईल. तसेच संरक्षण व संगोपनासाठी केलेला खर्च वाया जाईल. महापालिकेचा प्रस्तावित प्रकल्प उभारू नये. तसेच वृक्षतोड झाल्यास न्यायालय अथवा ‘एनजीटी’कडे जाण्याचा इशारा महापालिकेला नोटिसीद्वारे देण्यात आला आहे.