देहूरोड : तळवडे येथे एका आयटी कंपनीच्या शेजारी, रस्त्यावरील अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा फ्रकार उघडकिस आला आहे. देहुरोड पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. किरण शंकर राहिज (वय 26, रा. काळेवाडी फाटा, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या र्फिीशरीवदीनुसार तळवडे येथे कामानिमित्त ते आले होते.
येथील चौकात एका कंपनीसमोर वाहनतळात त्यांनी आपली हिरोहोंडा स्प्लेंडर हि दुचाकी (एमएच 17 एसी 7059) लावली होती. येथून ते कंपनीत कामासाठी गेले. कामावरून आल्यानंतर त्यांची दुचाकी जागेवर नव्हती. आसपासच्या परिसरात शोध घेतल्यानंतर त्यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदविली. पोलीसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द मोटारसायकल चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.