चिखली : तळवडे येथील एका फर्निचरच्या गोदामाला आग लागली. यामध्ये गोदामातील साडेचार ते पाच लाखांचे फर्निचर जळून खाक झाले. तसेच शेजारच्या दुकानातील दीड लाखांचे सामान जळाले. ही घटना शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास तळवडे येथील गट नंबर 64 येथे घडली. समर्थ उद्योग असे गोदामाचे आहे. गुरुवारी रात्री दसर्यानिमित्त दुकानाचे पूजन झाल्यानंतर लावलेल्या अगरबत्तीमुळे आग लागली, असा कयास आहे. अग्निशमन दलाच्या नऊ बंबांनी दीड तास प्रयत्न करून आग विझवली.