वरणगाव । येथून जवळच असलेल्या तळवेल गावातील रहिवाशी भगवान जानकीराम पाटील (वय 49) यांनी 1 मार्च रोजी राहत्या घरी कोणते तरी विष सेवन केल्याने त्याला डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेज नशिराबाद येथे दाखल केले असता त्याच्यावर उपचार सुरू असतांना 3 मार्च रोजी मृत्यू झाला.
डॉ. श्रीकांत जाधव यांच्या खबरीवरुन वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक जोहरे करीत आहे.