तळोदा । तालुक्यातील तळवे येथील माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनाचा समारोप शुक्रवारी करण्यात आला या प्रदर्शनात प्राथमिक गटातून श्रीमोती विद्यामंदिराचा विद्यार्थिनी खुशनुमा शब्बीर मंसुरी हिचा डिजिटल कचरा डेपो तर माध्यमिक गटातून एस ए मिशन हायस्कुलचा अनमोल हेमंत वाणी याचा होम सिक्युरिटी सिस्टीम या उपकरणांना प्रथम क्रमांक मिळून त्यांची जिल्हा विज्ञान प्रदर्शनात निवड करण्यात आली आहे.
जागृतीपर उपकरणे सादर करा
तळोदा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन माध्यमिक विद्यालय तळवेच्या आप श्री संत गुलाम महाराज विज्ञान नगरीत आयोजित केले होते. या प्रदर्शनाचा समारोप शुक्रवारी करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी शरद मगर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पं.स. सभापती शांताबाई पवार, उपसभापती दीपक मोरे, पं.स. सदस्य सीताराम राहासे, माजी जि.प. सदस्य दिवाकर पवार, गटशिक्षणाधिकारी दिनेश वसावे, विस्तार अधिकारी संजय पाटील, जिल्हा मुख्यध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी गटविकास अधिकारी मगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, कुपोषण आरोग्य व स्वच्छालय या प्रमुख प्रश्नांवर स्थानिक जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी यावर उपकरणे सादर करण्याचे आवाहन केले. त्यांनी शेष ़फंडातून विज्ञान प्रदर्शनास आर्थिक मदत करण्याचेही आश्वासन दिले. मुख्याध्यापक निमेश सूर्यवंशी, प्रा.अजित टवाळे, सुनील परदेशी, आय.जी. पिंजारी, के.एम. पाडवी, दशरथ पाटील, एस.बी. मोरे, छाया खैरनार, नरेंद्र मराठे, मंगेश पाटील, भरत पाटील, महेश मगरे उपस्थित होते.
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झालेली उपकरणे अशी
प्राथमिक गटातून प्रथम- खुशानुमा शब्बीर मंसुरी (डिजिटल कचरा डेपो), द्वितीय- धनश्री अरविंद मगरे (बर्ड फिडर), तृतीय- वैष्णवी राजेश कलाल (सोलर एनर्जी), राखीव गटातून – अक्षय ईश्वर तडवी (सर्कल फॉर मॅथ), माध्यमिक गटातून प्रथम- अनमोल हेमंत वाणी, हर्षित सुनील मगरे, कुंदन नितीन सागर (होम सिक्युरिटी सिस्टीम), द्वितीय- कामेश प्रवीण सूर्यवंशी (ट्री शिफ्टींग हायड्रोलीक डिव्हाईस), तृतीय- चेतना संजय घाडगे, वैष्णवी धनंजय साळुंखे (पर्यावरण पूरक जैविक शेती), राखीव गटातून सुनील फुलसिंग राऊत (द बेसिक ऑफ जॉमेट्री), शिक्षक गटातून रवींद्र अरूनण गुरव (लोकसंख्या शिक्षण) यांनी यश मिळविले. परीक्षक म्हणून प्रा.बी.जी.माळी, प्रा.के.जे.सोनार, भरत कलाल, प्रा.एल.ऐन.पाटील, प्रा.एम.जी. मगरे, प्रा. पी.एस.जैन यांनी काम पाहिले.