तळीरामांची वाईनशॉपसमोर तुफान गर्दी

0

मुंबई: राज्यात कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी दारुची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर गेल्या दीड महिन्यापासून दारूपासून लांब राहिलेल्या तळीरामांनी आज सकाळपासून वाईन शॉपबाहेर तुफान गर्दी केली होती. अनेक ठिकाणी दारुच्या दुकानाबाहेर मंडप टाकण्यात आले होते. अनेक ठिकाणी तर तळीरामांनी स्वत:च सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत दारूच्या बाटल्या विकत घेतल्या. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात तळीरामांनी दारू विकत घेण्यासाठी दारुच्या दुकानाबाहेर मोठी गर्दी केल्याने पोलिसांना लाऊडस्पीकरवरून नियम आणि शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन लोकांना करावे लागले. अनेक वाईन शॉपबाहेरही तळीरामांनी सकाळी ७ वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या. नाशिकमध्येही बँकाप्रमाणेच वाईन शॉपबाहेर लोकांची प्रचंड गर्दी पाह्यला मिळाली. कडाक्याचे ऊन असल्याने येथील वाईन शॉपबाहेर मंडप उभारण्यात आले होते.