तळेगाव : फ्रेंड्स ऑफ नेचर्स असोशिएशन संस्थेच्या वतीने 14 एप्रिल रोजी वन्यजीव छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर छायाचित्रांचे प्रदर्शन दिनांक 14 ते 16 एप्रिल या कालावधीत फ्रेंड्स ऑफ नेचर्स असोसिएशनच्या निसर्ग अभ्यासिकेत आयोजित केले आहे.
अशी माहिती फ्रेंड्स ऑफ नेचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गणेश सोरटे यांनीं दिली. संस्था तळेगाव व मावळ परिसरात निसर्ग व पर्यावरण संवर्धनाचे कार्य गेली 18 वर्षे सातत्याने करीत आहे. या वर्षी वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेने वन्यजीवन छायाचित्र स्पर्धा आयोजीत केली आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार 14 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता तळेगावच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार 16 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा फ्रेंड्स ऑफ नेचर्स असोशिएशनच्या निसर्ग अभ्यासिकेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध छायाचित्रकार विक्रमजी पोतदार यांचे हस्ते होणार आहे. व त्याच वेळी विक्रम वन्यजीव छायाचित्रांचा स्लाईड शो दाखविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन 14 ते 16 एप्रिल या काळात सायंकाळी 6 ते 9 यावेळेत सर्वांसाठी खुले असून तळेगाव परिसरातील निसर्गप्रेमींनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन डॉ. गणेश सोरटे यांनी केले आहे.