चाळीसगाव – तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव व रोटरी मिलेनियम चाळीसगावतर्फे महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती निमित्ताने ‘स्वच्छता से सेवा’ या उपक्रमा अंतर्गत तळेगाव येथील गरीब व गरजू महिलांना डस्टबिनचे वाटप करण्यात आले. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.बी.एस.कमलापुरकर, जि.प.सदस्य अतुल देशमुख, तालुका आरोग्याधिकारी डॉ.देवराम लांडे, माजी उपप्रांतपाल डॉ.सुनिल राजपुत, संस्थापक मिलेनियम अध्यक्ष प्रितेश कटारिया, केतन बुंदेलखंडी, पं.स.सदस्य अजय पाटील, प्रिती चकोर, डॉ.आशा राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता से सेवा या अभियानाचा समारोप करण्यात आला. समाजाचे आपण देणे लागतो हे लक्षात ठेवून, रोटरी मिलेनियम चाळीसगावतर्फे विविध सामाजिक उपक्रमांची पर्वणी तालुक्यातील गरजूंना देण्याचे व्रत स्विकारल्याचे सांगून स्वच्छता घरोदारी ठेवण्याचे कार्य महिलांच्या माध्यमातून होत असते, म्हणूनच घरातील कचऱ्याची विल्हेवाट नीट लावण्याची सवय डस्टबिनमुळे होणार असल्याने निरोगी वातावरण घरोघरी मिळेल, असे रोटरी मिलेनियम अध्यक्ष तथा तळेगाव आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांनी नमूद केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी आरोग्य केंद्रात महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. रोटरी मिलेनियम प्रकल्पप्रमुख संदिप जैन, चेतन पल्लण, सोपान चौधरी, निलेश कोतकर, डॉ.गजेंद्र अहिरराव यांनी परिश्रम घेतले. यावेळी आरोग्य सहाय्यक एल.सी. जाधव, विठ्ठल चव्हाण, सुनंदा महाजन, राजू पाटील, अशोक परदेशी, श्रीमती पवार, सरला चव्हाण, सविता पेंभरे, योगिता शिंदे, सविता परदेशी, उदयसिंग पाटील, सुनिल मोरे, गटप्रवर्तक ज्योत्स्ना शेलार, सोनवणे, ज्ञानेश्वर भालेराव, लता मोरे, पुंजाबाई मोरे, मायाबाई चव्हाण, हिराबाई मोरे, यमुना मोरे आदींसह आशा स्वयंसेविका उपस्थित होते.