तळेगाव दाभाडे : येथील श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था व श्री गणेश तरूण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मोठ्या भक्तीभावात हा कार्यक्रम संपन्न झाला. शहरातील सुमारे 1250 महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाला तळेगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, नगरसेविका मंगल भेगडे, नगरसेविका वैशाली दाभाडे, माजी नगराध्यक्षा माया भेगडे, नगरसेवक अरूण माने, डॉ. शाळीग्राम भंडारी, कार्यक्रमाचे आयोजक व नगरसेवक संतोष भेगडे, मंडळाचे अध्यक्ष शैलेश धर्माधिकारी उपस्थित होते.
स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी शपथ
या कार्यक्रमप्रसंगी स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी उपस्थितांनी शपथ घेतली. ‘मुलगी वाचवा, मुलगी जगवा’ असा शपथचा आशय होता. कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. त्याचप्रमाणे लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवान महिलांना एलईडी टी.व्ही., होम थिएटर, वॉटर फिल्टर, टोस्टर, इस्त्री अशा भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश भेगडे व प्रणाली भेगडे यांनी केले.