तळेगाव दाभाडे । कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल, जैन इंग्लिश मीडियम स्कूल व मामासाहेब इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मातृदिनानिमित्त आईची महती सांगणारी नाटिका, नाटक, गीतगायन, कविता सादरीकरण, असे विविध उपक्रम शाळांमध्ये राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कलापिनी संस्थेच्या अनघा बुरसे होत्या. यावेळी माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, नगरसेविका मंगल भेगडे, शोभा भेगडे, मंगल जाधव, नीता काळोखे, विभावरी दाभाडे, वैशाली दाभाडे, कल्पना भोपळे, संध्या भेगडे, प्राची दळवी, संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, शालेय समिती अध्यक्ष डॉ. दिलीप भोगे, संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, उद्योजक राजश्री म्हस्के, गौरी काकडे उपस्थित होते.
जैन इंग्लिश स्कूल
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्रकाश ओसवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नेते मुकुंदराव खळदे, हेमलता खळदे, नगरसेविका नीता काळोखे, मंगल भेगडे, शोभा भेगडे, मंगल जाधव, नीता काळोखे, वैशाली दाभाडे, संध्या भेगडे, प्राची हेंद्रे, नगरसेवक अमोल शेटे, अरूण भेगडे पाटील, माजी नगराध्यक्षा माया भेगडे उपस्थित होते.
मामासाहेब खांडगे इंग्लिश स्कूल
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कविता सादर केल्या. दर्शना फड यांनीही हृदयस्पर्शी कविता सादर केल्या. शिक्षिका प्रणाली तारे यांनी जिजाऊंनी शिवरायांना कसे घडविले, ते कथा रुपात सांगितले. यावेळी ‘भाग्यवान माता की’ सोडत काढण्यात आली. त्यामध्ये नर्मदा मोहटी, शीतल ब्राम्हणकर, मीरा ताकभाते या विजयी झाल्या.