तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटपाचा ठराव मंजूर

0

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषदेच्या सर्व शाळामधील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्याचा ठराव नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेत करण्यात आला आहे. या ठरावाचे शालेय विद्याथ्यार्ंकडून स्वागत करण्यात येत आहे. नगरपरिषदेच्या महिला बालकल्याण समिती सभापती संध्या गणेश भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. या सभेत एकूण सात ठरावांना मंजुरी देण्यात आली.

ठरावास एकमताने मंजूरी…
यामध्ये, शहरातील नगरपरिषदेच्या 7 प्राथमिक शाळा आणि 2 माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर वाटप करण्याच्या ठरावास एकमताने मंजुरी देण्यात आली. यावेळी उपसभापती प्राची हेंद्रे, सदस्या काजल गटे, अनिता पवार, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे आदी उपस्थित होते.

तातडीने अंमलबजावणी करा…
नगरपरिषदेच्या शाळामध्ये 1 हजार 375 विद्यार्थी आणि माध्यमिक विभागात 273 विद्यार्थी असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संपतराव गावडे यांनी दिली. सभापती संध्या भेगडे यांच्या ठराव मंजूरीनंतर मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी या ठरावाची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणी केली. तर मुख्याधिकारी आवारे यांनी महिला बालकल्याण समितीच्या प्रशासकीय प्रमुख रसिका लामखेडे यांना अंमलबजावणीचे आदेश दिले.