तळेगाव बस स्टॅण्डवर अंध, अपंगासाठी स्वच्छता गृह

0

तळेगाव दाभाडे: तळेगाव सिटी रोटरी क्लबच्यावतीने येथील तळेगाव दाभाडे एस. टी. स्थानक आणि परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात सार्वजनिक स्वच्छता गृह आणि परिसरातील स्वच्छता करण्यात आली. माजी आमदार कृष्णराव भेगडे आणि रोटरीचे अध्यक्ष विलास काळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अंध अपंगासाठी विशेष स्वच्छता गृह बांधण्यात येणार आहे त्याचा भूमिपूजन समारंभ यावेळी करण्यात आला. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, नगरसेवक अमोल शेटे तसेच तळेगाव आगर व्यवस्थापक तुषार माने, नगरसेवक सचिन टकले, संध्या भेगडे, शोभा भेगडे आदी यावेळी उपस्थित होते.

…काळोखेंतर्फे धनादेश सुपुर्द
यावेळी रोटरी सिटीचे सेक्रेटरी नितीन शहा, नंदकुंमार शेलार, संजय मेहता, दादासाहेब उर्‍हे, दिलीप पारेख, प्रकल्प प्रमुख संतोष शेळके, राजेश गाडेपाटील, बाळासाहेब रिकामे, नरसिंग बजाज, प्रशांत भागवत, महेश बेंजामिन, भगवान शिंदे, दीपक फल्ले, मल्हारी शिंदे, सुरेश शेंडे, रामनाथ यलझारे उपस्थित होते. यावेळी मयूर काळोखे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छतागृहा करीता 51 हजाराचा धनादेश देण्यात आला. सूत्रसंचलन अनिल धर्माधिकारी तर आभार रोटरी सिटीचे उपाध्यक्ष शशिकांत हळदे यांनी मानले.