तळोदा ऐतिहासिक गढीचे बारगळ वंशजांच्याहस्ते पूजन

0

तळोदा । गड, किल्ले दिनाच्या पार्श्‍वभूमीवर येथील बारगळ वंशजानी येथील ऐतिहासिक बारगळ गढीचे विधिवत पूजन केले. तळोदा येथील येथील बरगळगढ़ी सन 1662 मध्ये भोजराज बरगळ यांनी बांधली होती. साधरण सहा एकर क्षेत्रावर ही गढ़ी उभी आहे. जवळपास पावनेचारशे वर्षांची परंपरा या गढ़ीला लाभली आहे. या गढ़ींने तळोदाद्याच्या सांस्कृतिक वैशिष्टयात भर घातली आहे. गढ़ीची पूजा तिचे वंशज दर वर्षी विजया दशमीच्या दिवसी करीत असतात. मात्र यंदा गड, किल्ले दिनाच्या दिवशी आपल्या गढ़ी ची ही पूजा करावी, अशी सूचना पुणे येथील शिरदार वतनदारांनी जहागीरदार अमरजीत राजे बारगळ यांना दिली होती.

सव्वा कोटीच्या निधीस मिळाली मंजुरी
रविवारी गढ़ी च्या प्रवेशद्वाराचे मंत्रोपचारने विधिवत पूजन करण्यात आले. आज राज्यातील सर्व गड, किल्ल्यांची पूजन केली जात आहे. दरम्यान, या ऐतिहासिक गढ़ीच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने नुकताच सव्वा कोटींचा निधी मंजूर केल्याचे पत्र देखील येथील सार्वजनिक बांधकाम विभागकडे पाठविण्यात आल्याचे समजते. त्याचप्रमाणे 40 लाखांचा निधी देखील या विभागकडे वर्ग केल्याचे पत्रात नमूद आहे. गढी ची दुरुस्तीची आवश्यकता आहे.

यांना मिळाला बहुमान
दरवर्षी 25 फेब्रुवारी रोजी राज्यातील वीर सेनानीचे वंशज व शुभ ऑफ वॉरिअर मराठा यांच्यातर्फे सर्व गट, कोट, दुर्ग यांचे पूजन त्यांचे वंशज करत असतात या पार्श्‍वभूमीवर आज तळोदा येथील ऐतिहासिक गढीमध्ये वंशज जहागीरदार ऋषिकेश बारगळ व कृषिका बारगळ यांनी पुजा केली.जहागिरदार अमरजित बारगळ, अस्मित बारगळ, धनंजय बारगळ, डॉ. देविदास शेंडे व ईश्‍वर चौधरी उपस्थित होते.