तळोदा । तळोदा शहर सातपुड्याच्या पायथ्याशी असून आधी सातपुडा हा घनदाट जंगल झाडांनी नटलेला पर्वत होता त्यामुळे शहरात उन्हाच्या झळा बसत नव्हते आणि पाण्याचा निचरा देखील होते झरे धबधबे बारमाही असत. त्यामुळे वातावरणात गारवा असत. परंतु कालांतराने झाडांची कत्तल आणि पुनर्वसनासाठी 4 हजार हेक्टर जमीन खुडली गेली त्यामुळे तो आता बोडका झाला. शहरातही मोठी डोलदार झाडे होती तीही अतिक्रमण, रस्ता या कारणांनी तोडली गेली परिणामी या उन्हाळ्यात तापमानाचा उच्चांकने कहरच केला तो 42 ते 43 अंश सेल्सियस तापमानाने गाठला आहे.
विविध आजारांची होतेय लागण
या असाह्य तापमानामुळे चक्कर येणे, जीव मळमळ करणे, डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा आदीं बाबींचा त्रास महिला व नागरिकांना होत आहे तापमानात होत असणारी वाढ ही जीवघेणी असल्याने यावर उपाययोजना न झाल्यास येणार्या काळात सजीवसृष्टीला मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार यात काडीमात्र शंका नाही तर डॉक्टरांकडून सल्ला देण्यात येत आहे उन्हांत बाहेर पडू नका, डोक्यावर रुमाल बांधा, शिळे अन्न खाणे टाळा, दुपारी झोप घ्या, पाणी भरपूर प्रमाणात प्या असा सल्ला तज्ञ डॉक्टरांकडून देण्यात येत आहे यामुळे येणार्या पावसाळ्यात शासनाचा वृक्ष लागवड मोहिमेला नागरिकांचा लोकसहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.
वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष
असह्य उकाळ्यामुळे व येणार्या झळामुळे नागरिक त्रस्त झाले असून दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट असून अघोषित संचारबंदी सारखं वातावरण दिसत असून नागरिकांनी दुपारी बाहेर निघाणेच बंद केले आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या तळोदा तालुक्यात सातपुडा ने नटलेले घनदाट जंगल होते परंतु पुनर्वसनासाठी 4 हजार हेक्टर जमीन खुडली गेली त्या प्रमाणात वनविभागाने तालुक्यात वृक्ष लागवडीवर भर न दिल्यामुळे व शहरातील सर्वच रस्ते काँक्रिटीकरण केल्यामुळे जमिनीची धूप वाढतच गेली प्रसंगी तापमानाचा आकडा कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढला असून यावर उपाययोजना म्हणून वृक्ष लागवड करणे गरजेचे असल्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करित आहे तर प्रशासन नागरिकांनी पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे