तळोदा पालिकेचे अतिक्रमणाकडे दुर्लक्ष

0

तळोदा । शहरातील दररोज होणारी वाहतूकची कोंडी पाहतासध्या शहरातील प्रमुख काँक्रीट गटाचिे काम सुरु असून या बरोबरच अतिक्रमण देखील काढता येऊ शकते. मात्र पालिकेची इच्छाशक्ती अतिक्रमणाबद्दल अजिबात दिसून येत नसल्याने आता अतिक्रमण मोहीम थंड बस्त्यात जाण्याची चिन्ह दिसत आहेत. तळोदा शहरातील वाढती कोंडी पाहता दोन वर्षीपूर्वी मार्च महिन्यात अतिक्रमण मोहीम पालिकेने हाती घेतली होती. मात्र पुनः जैसे थे परिस्थिती झाली आहे. मात्र पुन्हा अतिक्रमण पुढे आल्यास कठोर कार्यवाही करण्याचे बजवण्यात आले होते, मात्र या बाबत पुढे कोणतेही कार्यवाही झाली नाही. कार्यवाही करायची नव्हती तर अतिक्रमण मोहीम राबविण्याचा फलित काय असा नागरिकांमधून प्रश्‍न निर्माण होत आहे.

मागीलवर्षी निघाले होते अतिक्रमण
मोहीम शहरातील कॉलेज रोड, हुतात्मा चौक, तहसील कचेरी रोड, स्मारक चौक, नगरपालिका परिसर, सोनारवाडा, हातोडा रोड, ख्वाजा नाईक चौक, देशपांडे फोटो स्टूडियो ते बसस्थानक परिसर, शहादा रोड, चीनोदा रोड, बदरी कॉलनी रोड अश्या शहरातील महत्वाचा भागातील रस्त्यावर मोहीम जोरदार राबविण्यात आली होती. यावेळी एकूण 579 किरकोळ व पक्के अतिक्रमण धारकावर पालिकेकडून कार्यवाही करण्यात आली होती. दरम्यान पालीकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी घेतलेल्या ठोस भूमिका ही सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता. तळोदा पालीकेच्या इतिहासात प्रथमच एवढी ठोस कार्यवाही पवार यांनी केल्यान त्याचे सर्वत्र कौतुक झाले होते. मात्र आता पुन्हा अतिक्रमण ने डोकं वर काढले असून काही धनदांडगेचे अतिक्रमण निघाले असले तरी त्यांना विशेष फरक पडला नाही. मात्र याचा फटका रस्त्यावर व्यवसाय करणारे व किरकोळ कच्चे अतिक्रमण धारकांना बसला आहे.

पोलिस बंदोबस्तात निघाले होते शहरातील अतिक्रमण
तळोदा नगरपालिका अतिक्रमण निर्मूलन मोहीमेस दोन वर्ष पूर्ण होत आले असून मागील वर्षी मार्च महिन्याचा दुसर्‍या पंधरवड्यात कडक पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण मोहीम हाती घेऊन पालिकेने तळोदा शहर मोकळे झाले होते. मात्र पुन्हा जैसे थे स्थिती झाली आहे. आता शहरातील प्रमुख गटार पक्के बांधकाम सर्वत्र सुरु असून या गटार वर लोकांनी अनधिकृत बांधकाम केले आहे, तसेच ठिकठिकाणी शेड उभे केले आहेत वास्तविक गटार बांधकाम करतांना हे तोडणे अपेक्षित होते. मात्र पालिका प्रशासन व सत्ताधारी यांची इच्छा शक्ती नसल्याचे एकंदरीत दिसून येते.

जनार्दन पवार यांची भूमिका अतिशय महत्वाची
तळोदा नगरपालीकेच्या इतिहासात अनेक अनुभवी व नावजलेले मुख्याधिकारी येवून गेले मात्र येथे रुजू होण्यागोदार इरिगेशन खात्यात कामाचा अनुभव असलेले श्री जनार्धन पवार हे मुख्याधिकारी या पदावर प्रथमच सुरुवातीला तलोदा नागरपालीकेत रुजू झाले मात्र रुजू झाल्यानंतर तळोदा शहरातील अत्यंत महत्वाची असणारी अतिक्रमण मोहीम हाती नुसती घेतली नाही तर नगरपालिकेच्या जागा मोकळी करण्याचा प्रमाणिक प्रयत्न आपल्या ठोस कृतीतून दाखवुन दिले होते मात्र त्या नंतर अचानक मुख्याधिकारी यांनी मोहीम जितक्या दणक्यात चालू केली होती तितकी पूर्णत्वास नेली नाही, कारण या मोहिमेत लाखो रुपये शासनाकडून खर्च झाला जर मोहीम अर्धवट अथवा पून्हा होऊ नये या साठी कठोर भूमिका पालिका प्रशासन ला घेणे आवश्यक होते असे मात्र होताना दिसली नाही, मग अतिक्रमणचा फार्स केलाच का? असा प्रश्न तळोदेकर जनतेत चर्चिला जात आहे.

वाहतुकीची कोंडी सुटतासुटेना
तळोदा शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून चारचाकी वाहने दुचाकी दरोरोज येत आहेत. मात्र रस्ते मार्यदित असल्याने वाहतुकीची कोंडी सुटता सुटत नाही. आता पुन्हा अतिक्रमण वाढल्याने तळोदा शहराची अवस्था वाहतूक बद्दल गंभीर होत आहे. याबाबत वाहतूक शाखा देखील वाहन धारकांना व लॉरी धारकांना शिस्त लावण्यासाठी हतबल दिसत आहेत, शुक्रवारी बाजराचा दिवशी तर आमदार, तहसीलदार, प्रांताधिकारी यांची गाडी देखील संथ गतीने निघते.